breaking-newsआंतरराष्टीय

श्रीलंकेत पर्यटनासाठी गेलेल्या जनता दलाचे ५ सदस्य बेपत्ता; दोघांचा मृत्यू

ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेची राजधानी कोलंबोत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर श्रीलंकेत पर्यटनासाठी गेलेले जनता दल युनायटेड या भारतातील राजकीय पक्षाचे ७ सदस्य बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या हवाल्याने एएनआयने याबाबत ट्विट केले आहे.

कुमारस्वामी यांनी म्हटले आहे की, कोलंबोतील स्फोटांनंतर जेडीएसचे ७ सदस्य बेपत्ता असल्याचे माझ्या कानावर आले आहे. यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतेच स्पष्ट केल्याने मला धक्काच बसला आहे. हे दोघेही माझ्या चांगल्या परिचयाचे होते. या दुःखद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आम्ही त्यांच्या सोबत आहोत.

ANI

@ANI

HD Kumaraswamy: EAM Sushma Swaraj has confirmed death of 2 Kannadigas, KG Hanumantharayappa & M Rangappa, in the bomb blasts in Colombo. I’m deeply shocked at the loss of our JD(S) party workers, whom I know personally. We stand with their families in this hour of grief.

ANI

@ANI

High Commission of India in Sri Lanka confirms death of two more Indian nationals, K G Hanumantharayappa & M Rangappa in the bomb blasts in Sri Lanka yesterday. Deaths of 5 Indian nationals have been confirmed so far.

View image on Twitter
४३ लोक याविषयी बोलत आहेत

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या माहितीनुसार, श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात दोन कन्नड नागरिकांचा मृत्यू झाला असून के. जी. हनुमनथरयाप्पा आणि एम. रंगप्पा अशी या दोघांची नावे आहेत, हे दोघेही जेडीएसचे सदस्य आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button