breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

श्रीराम मंदिर उभारणी कायद्यासाठी शिवसेना खासदार बारणेंचे समर्थन?

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – अयोध्यातील श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम मंदिर उभारण्याकरीता केंद्र सरकारने कायदा करावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. त्यासाठी सर्व खासदारांनी या कायद्याचे समर्थन द्यावे, याकरिता विश्व हिंदू परिषदेकडून विनवणी केली जात आहे. राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्यानंतर आता शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या थेरगाव येथील कार्यलयात निवेदन देण्यात आले.  विहिंपचे प्रांत मंत्री विजयराव देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायकराव थोरात, जिल्हा कार्यवाह विलासराव लांडगे,  संघाचे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, संघाचे प्रांत विशेष संपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे, विहिंपचे शहराध्यक्ष शरद इनामदार, विहिंप जिल्हा मंत्री संदेश भेगडे, शहर मंत्री नितीन वाटकर, विहिंप पिं.चिं. शहर सह मंत्री संजय शेळके, बजरंग दलाचे प्रांतपालक अशोकराव येलमार, शहर संयोजक नाना सावंत, बजरंग दलाचे सह संयोजक सागर चव्हाण, वनवासी कल्याण आश्रमचे नरेंद्र पेंडसे, सावरकर मंडळ कार्यकारिणी रमेश बनगोंडे आदी यावेळी उपस्थित होते.

लोकसभेचे खासदार म्हणून आपण रामभक्त आणि संत समाजाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवाव्यात आणि श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम मंदिर निर्माणाच्या कायद्याचे समर्थन करावे, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button