breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र
श्रावण महिना सुरु झाला, मंदिरं खुली करा, चंद्रकांत खैरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
औरंगाबाद : शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलेले आहे. “श्रावण महिना सुरु झाला आहे. सणवारांचा हा महिना आहे. त्यामुळे मंदिरं खुली करा, मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि विधी करण्यास परवानगी द्या”, अशी विनंती चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रामार्फत केलेली आहे.
“आता श्रावण महिना सुरु झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून पूजापाठ बंद आहे. निदान श्रावण महिन्यात तरी महादेवांचं दर्शन आणि पूजन व्हायला हवं. श्रावण महिन्यात महादेवाचं पूजन आणि दर्शनाला खूप महत्त्वव असतं. त्यामुळे श्रावण महिन्यात लाखो नागरिक महादेवाची पूजा करतात आणि मंदिरात दर्शनासाठी जातात”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी ‘एका मराठी’ वृत्तवाहिनी सोबत बोलताना दिली आहे.