breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडलेख

वाढदिवस विशेष: कार्यकर्त्यांचे दादा…माहाराष्ट्राचे अजितदादा- सुनील गव्हाणे

मला आठवतंय….दादा उपमुख्यमंत्री होते. मी पिंपरी चिंचवड शहराचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा कार्याध्यक्ष. विद्यार्थी संघटनेतील माझ्या एका मित्राचं लग्न होतं. दादा लग्नाला आले पाहिजेत अशी त्याची इच्छा. म्हणून मग आम्ही लग्नाच्या दिवशी सकाळीच दादांच्या मोबाइल वर विनंतीचे SMS केले. उत्साहाच्या भरात मात्र गरजे पेक्षा जास्त SMS आमच्याकडून केले गेले.

दुपारचे १२ वाजले असतील. मी घरीच होतो. अचानक माझा मोबाईल वाजला आणि मोबाईल वर No Caller ID असे नाव आले. मला काही लक्षात आले नाही. मी सहजच फोन उचलला आणि समोरून आवाज आला…

मी अजित पवार बोलतोय….

क्षणभर मनात एकदम धस्स झालं. आयुष्यात पहिल्यांदाच फोनवर दादांशी बोलत होतो.

दादा मात्र चिडून बोलत होते. “कोण बोलतंय…समजत नाही का? मला खूप डिस्टर्ब होतंय. तुम्ही वारंवार मेसेज करताय. तुम्हाला कळत नाही का? माझी आई आजारी आहे. आम्ही सगळे कुटुंबातील सदस्य हॉस्पिटलमध्ये आहोत. आईला बरं वाटतं नाहीये. आम्ही सगळे चिंतेत आहोत आणि तुम्ही वारंवार मेसेज वर मेसेज करताय. मी माझ्या आईकडे बघायला हवं की लग्नाला यायला हवं? तुम्हीच सांगा? की मी फक्त राजकारणच करू? घराकडे कुटुंबीयांकडे बघूच नको का?”

मी लगेच दादांना सॉरी म्हणालो. दादा मला कल्पना नव्हती माफ करा. एवढ्यात फोन कट झाला होता.

मला खूप वाईट वाटलं. माझाच मला राग यायला लागला होता. माझ्या उतावीळ आणि अतिउत्साही स्वभावामुळे मी नकळत दादांना दुखावले होते. मी तसाच स्तब्ध बसून राहिलो. इतक्यात माझा फोन परत वाजला. पुन्हा त्यावर लिहून आला होतं. No Caller ID……

आता मात्र माझी टरकली होती. नकळत नेटवर्क क्यू मध्ये बाकी राहिलेले SMS पुन्हा दादांच्या मोबाईलवर गेले असतील अशी मला शंका आली. आता तुझी काही खैर नाही असं मन मला सांगत होतं.

मी तसाच गडबडीत फोन उचलला आणि पटापट बोलू लागलो. दादा सॉरी… सॉरी दादा… आता मी नाही केला SMS…. चुकून आला असेल….मी त्या मित्राला पण फोन करून शिव्या दिल्या की तू अजून इतरांना कशाला SMS करायला सांगितल…. दादा सॉरी…. सॉरी दादा… तेवढ्यात फोन मधून आवाज आला…

“येsss अरेsss ऐकून तर घे ! तुझ्या त्या मित्राला शुभेच्छा सांग माझ्या आणि मला वेळ मिळाल्यावर मी भेटून जाईन सांग !
मी ओके दादा…ओके दादा… सांगतो दादा… सॉरी दादा… म्हणतच होतो तो पर्यंत फोन कट झाला होता.

मी तसाच खाली बसलो. क्षणभर काय झालं कळलंच नाही. नंतर मात्र विचार करत बसलो. कोण आपण? दादा आपल्याला ओळखत तरी असतील का? कोण आपला मित्र? काय त्याचा दादांशी संबंध? पण….

एक उपमुख्यमंत्री पदावरचा नेता. ज्याच्या हृदयाच्या सर्वात जवळची व्यक्ती आजारी आहे. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. सर्व कुटुंबातील सदस्य टेन्शन मध्ये आहेत अशा परिस्तिथीमध्ये दुसऱ्या एखाद्या नेत्याला त्रास दिला असता तर त्याने शिव्याच हासडल्या असत्या. दादांनी मात्र….

आपण नकळत मानसिक ताणाच्या आणि दुःखाच्या भरात एका कार्यकर्त्यावर चिडलो त्याला वाईट वाटलं असेल. त्याचा आग्रह हा त्याच्या कार्यकर्त्यासाठीच होता. हे लक्षात घेऊन दादांनी मात्र परत कॉल केला आणि मित्राला शुभेच्छा द्यायला सांगितलं.

असे अजितदादा आम्ही कार्यकर्त्यांनी अनुभवले आहेत, पाहिले आहेत. इतरांना दादा रागीट, तापट, ओरडणारे आहेत असे वाटतात किंवा मुद्दाम विरोधी पक्ष किंवा मीडिया कडून त्यांना तसं दाखवलं जातं. पण दादा काटेरी फणसा सारखे आहेत ते वरून खूप रागीट, तापट दिसत असतील पण आतून खूप हळवे, प्रेमळ, काळजी घेणारे आहेत. संवेदनशील आहेत. प्रत्येक कार्यकर्ता, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक हा त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्या सारखाच आहे. हे आम्ही वेळोवेळी अनुभवलं आहे. पाहिलं आहे.

असे आहेत…
कार्यकर्त्यांचे दादा…

दादा, आपणांस वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

  • लेखक :
  • सुनिल विजय गव्हाणे
    शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,
    पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)
    ९३७२३३३३५७
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button