breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी पुत्राने साडेचार एकर जमीनीत तब्बल ६०० किलो बियाणे पेरून साकारली ‘शरद पवारांची’ भव्य प्रतिमा

उस्मानाबाद | महाईन्यूज |

निपाणी येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची 600 किलो बियाण्यांचा वापर करत ग्रास पेंटिंग केलेली आहे. पेरलेल्या बियांपासून अंकुर फुटून आलेल्या पिकात पवारांचे रेखीव चित्र साकारण्यात आलेलं आहे. निपाणी येथील शेतकरी पुत्र मंगेश निपाणीकर याने ही प्रतिमा साकारत पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवारांबाबतीत तरुणाईत कमालीची क्रेझ आहे. 80 वर्षाच्या पवारांचा उत्साह हा तरुणाईला प्रेरणा देणारा असून त्यांनी महाराष्ट्रात विधानसभेत मोठे यश मिळवीत राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मोट बांधत सत्ता स्थापन केली आहे. शरद पवारांना जाणता राजा आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या संकटात थेट बांधावर जाऊन विचारपूस करीत धीर देत न्याय देणारे नेतृत्व अशी पवारांची ग्रामीण भागात विशेष ओळख पूर्वीपासूनच आहे.

शरद पवारांची ही कलाकृती साडे चार एकर जमिनीवर साकारली असून त्यासाठी 600 बियाण्यांचा वापर करण्यात आला आहे. यात 200 किलो अळीव , 300 किलो मेथी , 40 किलो गहू, 20 किलो ज्वारी आणि हरभरा असे धान्य पेरणीसाठी वापरले आहे. पवारांची धान्यातील प्रतिमा साकारण्यासाठी जमिनीची मशागत करून त्यावर पेरणी करण्यात आली. त्यानंतर ते धान्य उगविण्यासाठी योग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने सिंचनाद्वारे पाणी देऊन उगविण्यात आले. 15 दिवसांच्या या अथक मेहनत आणि प्रयत्नातून पवारांची प्रतिमा साकारली असून ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तर सोशल मीडियावर याचे फोटो आणि कलाकृतीचे कौतुक देखील होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button