breaking-newsपिंपरी / चिंचवड

शेअर मार्केटद्वारे मोबदला मिळवून देण्याचे अमिष दाखवून फसवणूक

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शेअर मार्केटमध्ये चांगला मोबदला मिळवून देण्याचे अमिष दाखवून एक कंपनीने ग्राहकांची 4 लाख 21 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार 26 ऑगस्ट 2019 ते 8 सप्टेंबर 2019 दरम्यान गहुंजे येथे घडला.

राहूल राजाभाऊ भिलारे (वय 42, रा. बाणेर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राहूल भिलारे यांचे मोबाईल (7284954332, 8980739426, 9726585769) क्रमांकधारकांना लॅण्डमार्क स्टॉक कंपनीच्या नावाने शेअर मार्केटमध्ये चांगला मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यावर वेळोवेळी ठरावीक रक्कम गुंतविण्यास सांगून तब्बल 4 लाख 21 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button