breaking-newsपुणे

शुभम वायकर ठरला ‘ज्युनियर महाराष्ट्र श्री पदक’ गोल्ड मेडलचा मानकरी

औंध | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोल्हापूर तेथील राजारामपुरी येथे पार पडलेल्या ४३ व्या ‘जूनियर श्री २०२०/ २६ वी मास्टर महाराष्ट्र श्री / १८ वी फिजकली चँलेज महाराष्ट्र श्री /२ री ज्युनिअर मेन्स फिजिक या राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव व  फिटनेस स्पर्धेमध्ये औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शुभम वायकर या विद्यार्थ्याने ७० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला.

‘ज्युनियर महाराष्ट्र श्री पदक’ गोल्ड मेडल मिळविले. तसेच, संपूर्ण स्पर्धेमध्ये ‘मोस्ट इम्पूड बॉडीबिल्डर’ म्हणून द्वितीय क्रमांक मिळविला. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी त्यांचे अभिनंदन मानले. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यासह क्रीडा विभागप्रमुख प्रा. भीमराव पाटील, उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच सर्व प्राध्यापक,  प्रशासकीय सेवक आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या सर्वांनी त्याचे अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button