breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शिवसेनेत बंडखोरी उफाळली, नवी मुंबईत दोनशे पदाधिका-यांचे राजीनामे

नवी मुंबई |महाईन्यूज|

नवी मुंबईमध्ये शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या 200 पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामे दिले आहेत. एरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघ भाजपकडे गेल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये नवी मुंबईतील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आणि विभाग प्रमुखांचा समावेश आहे. 

नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदार संघातून भाजप गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत. बेलापूर विभागाचे शहरप्रमुख विजय माने यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे ऐरोलीमध्ये देखील तिच परिस्थिती पहायला मिळत आहे. ऐरोली मतदारसंघ भाजपकडे जाणार असल्याने नाराज होत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button