महाराष्ट्र

शिवसेनेकडून श्रीपाद छिंदम यांना महापालिकेत चोप

अहमदनगर –  छत्रपती शिवाजी महाराजांना अपशब्द वापरूनही अहमदनगर महापालिकेत अपक्ष निवडून आलेल्या श्रीपाद छिंदम यांना शिवसेना नगरसेवकांनी चोप दिला. महापौर निवडणुकीत सेनेला मतदान केल्याने छिंदम यांना शिवसेनेने चोप दिला. छिंदम यांना झालेल्या या मारहाणीनंतर यांच्या घरासमाेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. श्रीपाद छिंदम यांना पोलिस बंदोबस्तामध्ये महापालिकेत यावे लागले होते.

अहमदनगर महापालिकेत सर्वांत मोठा पक्ष ठरूनही शिवसेनेला महापौर निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला. महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने शिवेसेनेला कात्रजचा घाट दाखवत बाजी मारली. भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांनी महापौर निवडणुकीत विजय मिळवला. राष्ट्रवादी आणि बहुजन समाज पक्षाने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विराजमान झाले.

सभागृहात महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केलेल्या संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे वाकळे व सेनेचे बाळासाहेब बोराटे असे दोन उमेदवार रिंगणात होते. वाकळे यांना ३७ मते मिळाली. त्यात भाजप १४, राष्ट्रवादी १८, बसपा ०४  आणि एक अपक्ष अशी ३७ मते मिळाली. सेनेच्या बाळासाहेब बोराटे यांना २३ इतकी मते मिळाली.

महापालिकेत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला बाजू ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता होती आणि तसेच झाले. भाजप व राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक एकाच बस मधून महापालिकेत दाखल झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button