breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना नगरसेवकावरील खोट्या गुन्ह्याविरूद्ध सर्व पक्षीय नगरसेवक एकवटले

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे नगरसेवक डॉक्टर मुद्दसर सय्यद यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून उलट त्यांच्यावरच पारनेर पोलिस ठाण्यात दाखल विनयभंग आणि दरोड्याच्या खोट्या गुन्ह्याचा फेरविचार करण्याची मागणी पारनेर नगरपंचायत समितीचे नगराध्यक्षा वर्षा नगरे यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवकांनी पारनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,

पारनेर येथे 22 फेब्रुवारी रोजी जागेच्या वादातून शिवसेना नगरसेवक डॉक्टर सय्यद मूद्दसर यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता, दरम्यान त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या त्यांच्या विरोधी गटाने हल्ला करून त्यांच्यावरच विनयभंग व दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे,

शिवसेना नगरसेवक सय्यद यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सय्यद यांनी देखील मला कुऱ्हाडीने मारहाण झाल्याचा गुन्हा त्यांच्या विरोधीवर केला असून त्यांचा विरोधी हे हातात कुऱ्हाडी घेऊन रस्त्याने दहशत करत असल्याचा Cctv देखील व्हायरल झाला आहे. असं असताना पोलिसांनी झालेल्या प्रकरणाची योग्य शहानिशा न करता नगरसेवक मूद्द्सर सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सय्यद यांच्यावर दाखल खोट्या गुन्ह्यांचा फेरविचार करण्याची मागणी पारनेर नगर पंचायतीच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक गवळी यांच्याकड़े केली आहे ,

नगरसेवक सय्यद यांच्यावर पारनेर पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल होताच त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा नगराध्यक्षा वर्षा नगरे यांच्याकड़े सुपूर्द केला मात्र दाखल गुन्हा खोटा असून पोलिसांनी योग्यरित्या शहानिशा करून गुन्हा दाखल करावयाचा होता मात्र गुन्हा दाखल झाल्याने आता पोलिसांनी योग्यरित्या या खोट्या गुन्ह्याची शहानिशा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button