breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर जीवघेणा हल्ला

मुंबईतील अणूशक्तीनगर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचं वृत्त आहे. मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथील मेट्रो-३च्या परिसरात रात्री 12 वाजण्याच्या सुमारास काते यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यातून काते थोडक्यात बचावले असून त्याच्या सुरक्षारक्षकासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

शुक्रवारी महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रो कारशेडचे काम शिवसैनिकांनी बंद पाडले. तेथून परतत असतानाच काते यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्र नगर परिसरात सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे त्रास होतो अशी स्थानिक रहिवाशांची तक्रार होती. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीही काम थांबवण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. मेट्रोच्या कंत्राटदारांनेच हल्ला घडवून आणल्याचा आरोप काते यांनी केला आहे. या जीवघेण्या हल्ल्यातून काते बचावले असले तरी त्यांचे सुरक्षारक्षक आणि अन्य दोन सहकारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button