breaking-newsपिंपरी / चिंचवड

शिवजयंतीनिमित्त युवक काँग्रेसने काढली ‘शिवस्फुर्ती’ दुचाकी ‘रॅली’

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस द्वारे “शिवस्फुर्ती” दुचाकी रॅली काढम्यात आली.

“शिवरायांच्या कर्तृत्वाची प्रेरणा युवकांना जीवनातील संकटावर मात करण्याची व अशक्याला शक्य करण्याची शिकवण देत कायम यश संपादन करण्याची स्फूर्ती दईल”, असे सांगत नरेंद्र बनसोडे यांनी शिवअभिवादनातून युवकांना शिवप्रेरणा व शिवस्फूर्ती मिळावी, म्हणून या रॅलीचे आयोजन केल्याचे सांगितले.

पिंपरी चौकातून निघालेल्या या रॅलीने प्रथम एचए कंपनी जवळील शिवस्मारकास अभिवादन केले. पुष्पहार अर्पण करून दुचाकी रॅलीची सुरूवात झाली. पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन घोषणा देण्यात आली. तेथून कार्यकर्ते लांडेवाडी चौकाकडे आले. येथे रायगडाच्या दरवाज्याच्या प्रतिकृती समोरील शिवरायांच्या पुतळयास पुष्पहार घालण्यात आला. नतंर दापोडी येथील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये सुमारे १०० दुचाकीस्वार सहभागी होते.

रॅलीचे नेतृत्व युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केले. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी विजय ओव्हाळ, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, जिल्हा युवक सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, करण गील, अनिकेत अरकडे, गौरव चौधरी, रोहीत तिकोणे, फारूक खान, अनिल सोनकांबळे,,बाळासाहेब डावरगावे, सैज्जाद चौधरी, सौनू शेख, अदित्य खराडे, सोहेल शेख, राहूल पवार, शुभम शिंदे, पांडूरंग वीर आदि पदांधिका-यांसमवेत बहूसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button