breaking-newsपिंपरी / चिंचवड
शिरूरमध्ये दोन मित्रांनी मिळून आपल्याच मित्राचा केला खून
शिरुर – शिरूर तालुक्यात कारेगाव येथे दोन मित्रांनी मिळून आपल्याच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी घडला होता. दादाभाऊ नवले यांचं अपहरण करून त्यांना आरोपी विनोद जाधव आणि सनी जाधव यांनी जीवे मारून त्यांना शिरूर येथील घोडनदीत फेकून दिल्याचा, प्रकार होता.
रांजणगाव पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटकही केली होती. मात्र या अटकेनंतर त्यांचा तपास थांबला नाही. त्यांनी तात्काळ या दोन्ही आरोपींना आपल्या पद्धतीने विचारपूस करून घेत संपूर्ण माहिती घेतली. या गुन्ह्यात तिसराही आरोपी आहे असे निष्पन्न झाले चेतन शहाजी जाधव असे तिसऱ्या आरोपीचे नाव असून या तीनही आरोपींकडून चार चाकी अल्टो कार तलवार सोन्याची चैन व असा एकूण पाच लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आले आहे.