breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षण विभागात ‘खळ्ळखट्ट्याक’, ‘मनसेने फोडली केबीन’, एकजण जखमी

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्याप शिक्षण विभागाकडून शालेय साहित्य मिळालेले नाही. अनेकदा मागण्या करूनही राजकीय पक्ष अथवा सामाजिक संघटनांच्या निवेदनांना केराची टोपली दाखविली जात आहेत. याच्या निषेधार्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज शिक्षण विभागात खळ्ळखट्ट्याक आंदोलन केले. स्वतःच्या बेजबाबदारपणामुळे तापलेल्या वातावरणाचा अंदाज घेऊन पलायन करणा-या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या दालनातील त्यांची खुर्ची मनसेच्या कार्यकर्त्यांनी दालनाबाहेर पळवून नेली.

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी दिल्या जाणा-या साहित्यांचे अद्याप वाटप केले नाही. शाळा सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला. शालेय साहित्य वाटप करण्याबाबत वेळोवेळी शिक्षण विभागाशी विचारणा केली. राजकीय पक्ष अथवा सामाजिक संघटनांनी देखील निवेदने दिली. त्या निवेदनांना शिक्षण विभागाने केराची टोपली दाखवली. मनसेच्या मागण्याही शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचा-यांनी धुडकावून लावल्या. त्याच्या निषेधार्त आज शहर मनसेच्या पदाधिका-यांनी संयम सोडला. शिक्षण विभागात जाऊन धडाकेबाज आंदोलन केले. त्यावेळी प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे अनुपस्थित होत्या.

मनसेच्या पदाधिका-यांनी दिलेले निवेदन माध्यमिक विभागाचे प्रशासन अधिकारी पराग मुंडे यांनी स्वीकारले. मनसेच्या पदाधिका-यांशी त्यांनी बराचवेळ चर्चा देखील केली. ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे काही साहित्य वाटप होऊ शकले नाही. ज्या दिवशी न्यायालयाचा निकाल लागेल त्याच्या अधीन राहून पुढील कार्यवाही केली जाईल. शिवाय, डीबीटी अथवा साहित्य वाटपाबाबत उच्च समितीच्या सूचनांचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले. दरम्यान, ज्योत्स्ना शिंदे यांच्या दालनातील त्यांची खुर्ची मनसेच्या कार्यकर्त्यांनी पळवून नेली. त्यावेळी सुरक्षारक्षक आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. यात दालनाची काच फुटली गेली. या चकमकीत सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले आहेत.

  • मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे यांनी हे आंदोलन केले. यात राजू सावळे, बाळा दानवले, रुपेश पटेकर, सीमा बेलापूरकर, अनिकेत प्रभू, मयूर चिंचवडे, विकास कदम, विक्रम आडे, के. के. कांबळे, अनिता पांचाळ, सुरेश सकट, निखिल सावंत, संगीता देशमुख, श्रध्दा देशमुख, अनिल भुजबळ आदी मनसैनिक सहभागी होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button