breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

शाहरूख खानची सासू सविता छिब्बर अडचणीत,भरावा लागणार 3 कोटींचा दंड

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानची सासू सविता छिब्बर अडचणीत सापडल्या आहेत. अलिबाग येथे असलेल्या त्यांच्या फार्म हाऊसला तीन कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. भाडेकरार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

शाहरूख खानची सासू आणि गौरी खानची आई सविता छिब्बर आणि बहिण नमिता छिब्बर या देजाऊ फार्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आहेत. अलिबागमध्ये छिब्बर मायलेकीच्या मालकीचा आलिशान फार्म हाऊस आहे. २००८ साली हे फार्म हाऊस बांधण्यात आले आहे.या हाऊसवर बॉलिवूडमधील अनेक पार्टी झाल्या आहेत. यामध्ये शाहरुख खानच्या ५२ व्या बर्थडे पार्टीचाही समावेश आहे. १.३ हेक्टरवर वसलेल्या या फार्महाऊसमध्ये स्विमिंग पूल आणि हेलिपॅडही आहे.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी 29 जानेवारी २०१८ रोजी छिब्बर यांच्या बंगल्याला नोटीस पाठवली होती. प्लॉट खरेदी केल्यानंतर रायगडच्या तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी १३ मे २००५ रोजी शेतीची परवानगी दिल्याचं नोटिशीत लिहिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button