breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात ४६ ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात फळे, भाजीपाला विक्री केंद्र सुरू होणार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भाजापाल्याचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या कार्यक्षेत्रात प्राथमिक स्तरावर प्रत्येक प्रभागामधील मोकळ्या जागेत किमान एक तात्पुरत्या स्वरुपातील फळे व भाजापाला विक्री केंद्र सुरु केले जाणार असून शहरातील ४६ ठिकाणी फळे व भाजीपाला विक्री केंद्र तात्पुरत्या स्वरुपात उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ” कोरोना ” COVID – 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका, राज्यशासन व पोलिस प्रशासन यांच्या मार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. संपूर्ण देशात कलम १४४ अंतर्गत लॉकडाऊन लागू करुन शहरातील विविध ठिकाणी संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवडमधील नागरिक आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शहरामधील बाजाराचे ठिकाणी नाहक गर्दी करताना दिसून येत आहेत. यावर आळा बसणेसाठी महापालिकेच्या वतीने प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील भाजी मंडईचा समावेश होतो. नागरिकांना भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागामध्ये मोकळया जागेत किमान एक तात्पुरत्या स्वरुपातील फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्यात येतील. सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत सुरु करण्यात येणा-या या केंद्रामध्ये येणा-यांसाठी नियम निश्चित करण्यात आले आहेत.

या केंद्रामध्ये येणारा प्रत्येक ग्राहक सॅनिटायझरचा वापर करुनच प्रवेश करेल अशी व्यवस्था याठिकाणी असेल. यासाठी नागरिकांना जाण्या-येण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतील. या ठिकाणी आलेल्या व्यक्तींनी सोशल डिस्टसिंग पाळणे अनिवार्य असेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी एकाचवेळी जास्त नागरिक आल्यास त्यांच्यासाठी सोशल डिस्टसिंग नुसार स्वतंत्र प्रतिक्षालयाची देखिल व्यवस्था केली जाईल. नागरिकांच्या सोयीसाठी व त्यांचे शारिरीक तापमान तपासणीसाठी इन्फारेड थरमल गनचा वापर या केंद्राच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.

तसेच प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी एका जबाबदार अधिका-याची नेमणूक देखील करण्यात येईल. तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणारी ही फळे व भाजीपाला विक्री केंद्रे टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येतील. तथापि शहरातील महापालिकेच्या पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली, वाकड, भोसरी आणि थेरगाव येथील बंदिस्त भाजी मंडई पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येतील, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

पहिल्या टप्प्यात तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात येणारी फळे व भाजीपाला केंद्रे

१) नियोजित महापौर निवासस्थान मोकळे मैदान, सीटी प्राईड शाळेच्या शेजारी, प्राधिकरण निगडी

२) डी – मार्ट शेजारील भूखंड , रावेत.

३) गाव जत्रा मैदान, भोसरी.

४) अण्णासाहेब मगर स्टेडीयम, नेहरुनगर, पिंपरी.

५) सीडीसी ग्राऊंड , शनिमंदिर समोर , पुर्णानगर , चिखली.

६) सर्व्हे नं . ६२८ , वनदेवनगर, थेरगाव,

७) पीडब्लूडी ग्राऊंड, सांगवी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button