breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात विविध विकास कामे करण्यासाठी साडेसहा कोटी रुपयांच्या खर्चास स्थायीची मान्यता

पिंपरी – शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे 6 कोटी 68 लाख रुपयांच्या खर्चास आज (बुधवारी) स्थायी समितीने मान्यता दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. 

महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात यु.पी.एस. सिस्टीम (4 यु.पी.एस.) ची वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्यासाठी टॅक्ससहीत येणा-या सुमारे 4 लाख 71 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. तसेच वायसीएम रुग्णालयातील चार टॉवर लिफ्टसचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी टॅक्ससहीत येणा-या सुमारे 8 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. यासह प्रभाग क्रमनांक 41 भाटनगरमधील भाजी मंडई परिसरात काँक्रीटीकरण करण्यासाठी येणा- या सुमारे 32 लाख 38 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 25 मध्ये पेव्हींग ब्लॉक, गटर्स दुभाजक फुटपाथ व मनपा इमारतीची किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 40 लाख 99 हजार रुपयांच्या खर्चाससह पालिकेमध्ये केंद्र शासनाचे धोरणानुसार सी.एस.आर ऍक्टीवीटी राबविण्यासाठी येणा-या सुमारे 70 हजार प्रतीमहा रुपयांच्या खर्चास सल्लागार नेमणे , वाय.सी.एम रुग्णालयाकडील विविध वार्डसाठी आवश्यक खुर्चा खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे 5 लाख 81 हजार रुपयांच्या खरेदी करणे,  ‘ब’ प्रभागातील ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे 6 कोटी 60 लाख 76 हजार रुपयांच्या खर्चास, चोविसावाडी शाळा व यशवंतनगर शाळेतील विद्यार्थी वाहतुकीसाठी करण्यासाठी येणा-या सुमारे 12 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button