breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात दोरेमुक्त वड अभियान

अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांचा उपक्रम 
पिंपरी –  ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या वृक्षाची मनोभावे पूजा करतात. पुजेसाठी वडाच्या झाडाला दो-याने फेरे मारले जातात. वटपौर्णिमेच्या दुस-या दिवशी महिलांनी घट्ट केलेल्या या दो-यापासून वडाच्या झाडांना खिळेमुक्त उपक्रमाअंतर्गंत दोरे मुक्त करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ प्रभागामध्ये वृक्ष जतन व संगोपन अभियाना मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी खिळेमुक्त अभियान राबवून झाडांची खिळे, तारांपासून सुटका केली जात आहे. ज्येष्ठातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून प्रत्येक स्त्री त्या दिवशी वटवृक्षाची पूजा करते. शहरात वटपोर्णिमेनिमित्त वडाला सुवासिनींनी सात फेरे मारले. ठिकठिकाणी झाडाला दोरे बांधण्यात आले होते.
वटपौर्णिमेनंतर वडाच्या झाडांच्या सदृढतेसाठी अ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली दोरे मुख्य मोहीम गुरुवारी राबविण्यात आली. या मोहिमेतून अ प्रभागाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वडाची झाडे दोरेमुक्त करण्यात आली. या अभियानात अनघा बरवे, गायत्री गोरखे यांच्या स्थानिक नागरिकर, रिक्षाचालक व महिलांनी सहभाग घेतला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button