breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

शरद पवार यांनी शेजारच्या सीटवर बसून नातवाच्या ड्राईव्हिंगचा आनंद घेतला; पहा…

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अनेकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक गोष्टींबाबत आपलं मत व्यक्त करत असतात. एवढच नाही तर आपल्या कौटुंबिक आनंदात इतरांना सहभागी करुन घेताना दिसतात. मग तो बंधू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस असो, किंवा रक्षाबंधन. यावेळी त्यांनी सुपुत्र विजय सुळे यांना ड्राईव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतरच्या पहिल्या ड्राईव्हचा आनंद साजरा केला.

विजय सुळे यांनी मातोश्री सुप्रिया सुळे आणि आजोबा अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पहिल्यांदा ड्राईव्हवर नेले. शरद पवार शेजारच्या सीटवर बसून नातवाच्या ड्राईव्हिंगचा आनंद घेत आहेत, तर मध्येच नातवाला ते ड्राईव्हिंगचे धडे देतानाही दिसतात. सुप्रिया सुळे यांनी मागे बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला.

“आपली मुलं जेव्हा मोठी होतात, गाडी चालवायला शिकतात, तेव्हा वेगळा आनंद पालक म्हणून होतो, आज विजय सुळे, ज्यांना लायसन्स मिळाले आहे- लर्निंग आणि फायनल, तो त्याच्या आजोबांना ड्राईव्हला घेऊन चालला आहे” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“हळूहळू, हॉर्न उगाच वाजवू नका स्पीड लिमिट काय माहित आहे न?” अशा काही सूचनाही सुप्रिया सुळे लेकाला करताना ऐकू येतात. त्यामुळे खऱ्याखुऱ्या ड्राईव्हिंगचे धडे देताना आजोबा सख्ख्या नातवालाही ‘राजकीय स्टिअरिंग’ हाती धरण्याचे ट्रेनिंग देणार का, अशी चर्चा रंगली.

“सगळ्यांना छोट्या वाटत असल्या तरी आईसाठी मोठ्या गोष्टी असतात. इट्स अ स्पेशल मुमेंट फॉर अस” असे सुप्रिया सुळे यांनी दीड मिनिटांच्या फेसबुक लाईव्हमध्ये अखेरीस म्हटले आहे. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना दोन मुलं. कन्या रेवती, तर सुपुत्र विजय. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्याप्रमाणे शरद पवारांची सख्खी नातवंडे अद्याप राजकीय आखाड्यापासून दूर असल्याने त्यांचे फारसे दर्शन घडत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button