breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांच्या नावाने कोव्हिड सेंटर सुरु ; रुग्णांना मिळणार गरम दूध, अंडी

शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याने चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पारनेरमधील एका कोव्हिड सेंटरला त्यांनी शरद पवारांचं नाव दिलंय. खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य करण्यासाठी आणि राजकीय शक्तिप्रदर्शन म्हणून कोव्हिड सेंटरची ठिकठिकाणी उभारणी केली जात आहे. विविध संस्था, पक्ष आणि व्यक्तींकडून ही सेंटर सुरू केली जात आहेत. पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनीही स्वखर्चाने एक हजार बेडचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. तालुका स्तरावरील हे सर्वांत मोठे सेंटर आहे. विशेष म्हणजे लंके यांनी या सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात आलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या कोव्हिड सेंटरचे उदघाटन करण्यात येणार आहे. पारनेर तालुक्यातील कर्जुले ह्या या छोट्या गावाजवळील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात लंके प्रतिष्ठानच्या वतीने हे केंद्र उभारण्यात आले आहे. या शिवाय प्रतिष्ठानतर्फे तालुक्यातील एक हजार करोना रुग्णांचे पालकत्व घेण्याची घोषणाही लंके यांनी केली आहे.

लंके पूर्वी शिवसेनेत होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय औटी यांचा त्यांनी पराभव केला. अलीकडेच पारनेर नगर पंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याने लंके चर्चेत आले होते. आता शिवसेनेला शह देण्यासाठी भव्य कोव्हिड सेंटर उभारून त्याला पवारांचे नाव दिल्याने लंके पुन्हा चर्चेत येणार आहेत.

पवार यांच्या नावाने सुरू केलेल्या या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी गरम पाणी, दूध, अंडी, चहा, दोन वेळचे जेवण मोफत देण्यात येणार आहे. रुग्णांच्या करमणुकीसाठीही सोय करण्यात येत आहे. राज्यातील आदर्श कोव्हिड सेंटर ठरणार असल्याने त्याला पवारांचे नाव देण्यात आले आहे. दिवसेंदिवस करोना रुग्ण संख्या वाढल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. येथे दर्जेदार सुविधा आणि उपचार देण्याचा प्रयत्न असल्याचे लंके यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमधील त्रुटी सांगत त्यावर लंके यांनी टीका केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button