breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

शहीद पॅरा कमांडो जितेंद्र यांच्या मुलांना शिक्षण, नोकरीसह १ कोटींचा सन्मान निधी

मध्य प्रदेश |

तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले पॅरा कमांडो जितेंद्र कुमार वर्मा यांचे पार्थिव रविवारी मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील धामांडा या त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी शहीदांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहीद जितेंद्र यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार असल्याची घोषणा केली. याशिवाय १ कोटींचा सन्मान निधी आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी भोपाळ ते सीहोरपर्यंत लोकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी रस्त्याच्या कडेला उभे राहून गर्दी केली होती. त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. देशसेवेत जीवाचे रान करणारे वीर जितेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण गाव दु:खात असल्याचे चित्र होते. गावकऱ्यांनी फुलांचा वर्षाव करून आपल्या मुलाला श्रद्धांजली वाहिली. अपघाताची माहिती मिळाल्यापासून आमचे डोळे फक्त त्याच्या येण्याच्या वाटेकडे लागले असल्याचे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक जैस्वाल यांनी सांगितले. दुपारी आपल्या मुलाला तिरंग्यात लपेटलेले पाहून त्यांचे डोळे भरून आल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी दुपारी धामंडा गावात शहीदांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी येथील दिवंगत नायक जितेंद्र वर्मा यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून, कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यासोबतच शाळेला अमर शहीद जितेंद्र वर्मा यांचे नाव देण्याची घोषणाही त्यांनी केली.

दरम्यान, बुधवारी तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. सिहोर जिल्ह्यातील धामांडा गावातील या ३१ वर्षीय पॅरा कमांडो जितेंद्र वर्मा यांचाही या अपघातात मृत्यू झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button