breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावरुन ; सत्ताधा-यात समन्वयाचा अभाव तर विरोधकाची व्दिधा मनःस्थिती

पिंपरी- महापालिकेच्या वतीने मोशीतील कचरा डेपोत कच-यातून वीज निर्मिती (वेस्ट टू एनर्जी) हा डीबीआेटी तत्वावर प्रकल्प उभारण्यात येत आहे.  सत्ताधारी भाजपचा महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पांबाबत भाजपच्या नगरसेविकेने शंकाचे निरसन होत नाही, तोपर्यत प्रकल्पांला मंजूरी देवू नये, अशी भूमिका घेतली. तर भाजपच्या भोसरीतील नगरसेवकांनी प्रकल्प किती चांगला आहे. हा प्रकल्प मंजूर न केल्यास शहरातील कच-यांच्या गाड्या सोमवारपासून डेपो जावू न देता पेटवून देण्याची भाषा केली. दरम्यान, सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्ये पडलेले दोन गटामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेविकात काही हा प्रकल्प चांगला आहे, परंतू, त्या प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करावे, सर्व विषय नगरसेवकांना समजावून सांगावा, सगळ्या प्रश्नांवर खुलासा करावा, अशी मतमतांतरे व्यक्त केली. दरम्यान, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावरुन सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये समन्वयांचा अभाव तर विरोधकांमध्ये व्दिधा मनःस्थिती असल्याचे दिसून आले. मात्र, सर्व चर्चअंती या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली.

शुक्रवारी झालेल्या महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून सध्यस्थितीला मोशी कचरा डेपोवर प्रतिदिन सुमारे 750 ते 800 मेट्रिक टन कचरा येत आहे. कचरा डेपोसाठी सुमारे 81 एकर जागा 1991 पासून पालिकेच्या ताब्यात आहे. त्याठिकाणी मेकॅनिकल कंपोस्टिंग प्लँन्ट, गांडूळ खत प्रकल्प, प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती असे प्रकल्प कार्यान्वयीत आहेत. तसेच, कचरा डेपोवर 20 ते 22 एकर जागेवर गेल्या 20 वर्षांपासून ‘ओपन डंम्पिंग’ केले जात आहे. तसेच, प्रक्रिया केलेला कचरा टाकण्यासाठी सॅनिटरी लॅन्डफिल टप्पा 1 आणि 2 विकसित करण्यात आला आहे.

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाबाबत मंगला कदम म्हणाल्या, ” शहरातील कच-याचा प्रश्न सुटण्यासाठी चांगले प्रकल्प होणे गरजेचे आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’चा कोट्यवधी रुपयांचा विषय आहे. या विषयाची सर्व नगरसेवकांना माहिती देणे गरजेचे होते. या कामाच्या ठेकेदारांचा एकच पत्ता आहे. त्यामुळे संशयाला वाव आहे. या विषयाची सर्वांना माहिती द्यावी, तोपर्यंत हा विषय तहकूब ठेवावा”अजित गव्हाणे म्हणाले, ” वेस्ट टू एनर्जी’साठी मोशी डेपोची जागा 21 वर्षे भाडेकराराने दिली जाणार आहे. या कामाचा ठेकेदार ब्लॅक लिस्ट आहे. महापालिका ब्लॅक लिस्ट कंपनीला जागा देणार आहे का ? हा विषय महत्वाचा आहे. त्याला आमचा विरोध नाही. परंतु, त्याची सविस्तर माहिती दिली पाहिजे” नाना काटे म्हणाले, “वेस्ट टू एनर्जीचे काम करणारा ठेकेदार चार ते पाच ठिकाणी ब्लॅक लिस्टमध्ये आहे” प्रमोद कुटे म्हणाले, “एवढा मोठा प्रकल्प असताना त्याची नगरसेवकांना माहिकी का दिली नाही ?” विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ” चांगल्या आणि निवडक कामाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाही. कच-याचा विषय शहराच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा आहे. हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे.

भाजप नगरसेविका सोनाली गव्हाणे म्हणाल्या, ” ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पामुळे कच-याचा प्रश्न सुटणार आहे. परंतु, विरोधक त्याला विरोध का करत आहेत, हे समजत नाही”  सारिका बो-हाडे म्हणाल्या, ” मोशीकरांनी किती दिवस कच-याचा त्रास सहन करायचा. संपूर्ण शहराचा कचरा मोशीत आणून टाकला जातो. या प्रकल्पांना विरोध करणा-यांनी आपल्या प्रभागातील कचरा मोशीतील डेपोत टाकू नये” सुवर्णा बुर्डे म्हणाल्या, ” ‘या प्रकल्पाला विरोध केल्यास सोमवारपासून मोशीत आम्ही कच-या गाडी येऊ देणार नाही. आंदोलन करुन कच-याच्या गाड्या पेटवून देवू” अखेरीस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वेस्ट टू एनर्जी’प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यानंतर महापौर नितीन काळजे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button