breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठाणे मधील मृत पक्षांचे Bird Flu साठीच्या चाचणीचे रिपोर्ट्स निगेटीव्ह: पशुसंवर्धन मंत्री

मुंबई |

भारतामध्ये केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश या भागात शेकडो पक्षी मेल्याने avian influenza ची दहशत पसरायला सुरूवात झालेली आहे. दरम्यान त्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणांनी कामकाज करायला सुरू केलेली आहे. अशामध्येच काल ठाणे नजिक काही पक्षी मृतावस्थेमध्ये आढळलेले आणि हा Avian Influenza महाराष्ट्रातही पोहचलेला की काय? अशी शंका अनेकांच्या मनात आलेली होती.

पण आज (7 जानेवारी) महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिलेल्या माहितीनुसार या मृत पक्षांच्या सॅम्पलचे परीक्षण करण्यात आलेले आहे. त्यांची बर्ड फ्लू चाचणी निगेटीव्ह आलेली आहे. मात्र असे असले तरीही राज्य सरकार याबाबत दक्ष आहे.ठाणे महानगरपालिका आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (6 जानेवारी) सकाळी हिल गार्डन, कोकणीपाडा आणि विजय गार्डन सोसायटी, कावेसर मध्ये 10-12 पक्षी मृतावस्थेत आढळले. मृत पक्ष्यांमध्ये 14 हर्न्स (लांब पायाचा बगळा) आणि कमीतकमी एक पॅराकीट (लांब शेपूट असलेला पोपट) यांचा समावेश होता.

एवियन इन्फ्लूएंजा वायरस H5N1 हे बर्ड फ्लूचे सर्वात मोठे कारण मानले जाते. एच 5 एन 1 हा असा एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे जो मानवांना संक्रमित करतो. हा विषाणू पक्षी तसेच मानवांसाठी खूप धोकादायक आहे. एकीकडे कोरोना वायरसचं संकट असताना आता एवियन इन्फ्लूएंजा वायरसच्या धुमाकूळामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन पुन्हा अलर्ट झालेलं आहे. हा रोग कोंबडीची आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी निकटतेमुळे होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावध राहणं, योग्यरित्या न शिजवलेले मांस खाणं टाळणं फायद्याचं असल्याचं सांगितलं जात आहे.

वाचा- फेसबुक, ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button