breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विरोधक आक्रमक : शिक्षण विभागाचा कारभार सैरभैर, प्रविण अष्टीकरांवर टिकेची झोड

पिंपरी – महापालिकेच्या शिक्षण विभागात अत्यंत ढिसाळ कारभार सुरू आहे. कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही. प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण नसल्यामुळे कामकाज सैरभैर झाले आहे. शिक्षण प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे यांना काही विचारल्यानंतर शिक्षण विभागाचे सर्वाधिकार अतिरिक्त आयुक्तांकडे आहेत त्यांनाच विचारा, असे उत्तर दिले जाते. त्यामुळे पालिकेच्या सर्वच विभागातील प्रशासकीय कामकाज अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर यांच्या इशा-यावर चालते की काय?, असा उपरोधीत प्रश्न उपस्थित करत शिक्षण समिती सदस्या विनया तापकीर, उषा काळे, अश्विनी चिंचवडे आणि सदस्य राजू बनसोडे यांनी संताप व्यक्त केला आहे.

 

शिक्षण समितीची स्थापना झाल्यापासून प्रशासन अधिकारी यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी, पटसंख्या वाढीसाठी नाविन्यपूर्ण प्रस्ताव शिक्षण समिती सभेपुढे आणणे अपेक्षीत होते. मात्र, आजपर्यंत एकही तसा प्रस्ताव समितीच्या विषयपत्रिकेवर आणला गेला नाही. कारगील विजय दिवस साजरा करणे, शिक्षक दिन साजरा करणे, या विषय़ांत सुध्दा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिल्याबाबत माहिती विचारली असता, माहिती घेऊन सांगते, अशा पध्दतीने त्या उत्तर देतात. शिक्षक दिन आणि शिक्षण परिषदेची माहिती त्यांना नसणे ही दुर्दैवाची बाब आहे.

 

लोकप्रतिनिधींच्या कोणत्याही पत्रास शिक्षण प्रशासन अधिकारी शिंदे यांचे उत्तर येत नाही. तेव्हा सर्वसामान्य नागरिकांच्या पत्राला उत्तर देण्याची अपेक्षा कशी काय ठेवता येईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थी हिताचा कोणताही निर्णय त्यांनी आजपर्यंत घेतलेला नाही. त्यामुळे त्यांना परत शासकीय सेवेत पाठवा. त्यांच्याजागी अनुभवी, कार्यशील, कृतीशील अधिका-याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सदस्या तापकीर, चिंचवडे, काळे आणि सदस्य बनसोडे यांनी प्रसिद्दीपत्रकाद्वारे केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button