breaking-newsक्रिडा

विराटला मिठी मारल्याने उर्वशी रौतेला झाली ट्रोल

सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकदा बॉलिवूड कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकतंच अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला नेटकऱ्यांनी एका फोटोमुळे ट्रोल केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या मेणाच्या पुतळ्याला मिठी मारून उर्वशीने एक फोटो काढला आहे. आपले खेळावरील प्रेम दाखवण्यासाठी उर्वशीने हा फोटो काढला पण, नेटकऱ्यांनी मात्र या फोटोवरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

१६ जून रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते. विश्वचषक २०१९ मधील भारत- पाकिस्तान सामन्यामध्ये भारतीय संघाला चिअर करण्यासाठी उर्वशीने हा फोटो पोस्ट केला. यावरून तिला बरंच ट्रोल करण्यात आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि कलाकारांमध्ये असणारी दरी कमी झाली असे अनेकांचे मत असले तरीही अनेकदा सेलिब्रिटींच्या दृष्टीने ही गोष्ट काहीशी निराशाजनक ठरते. याचाच प्रत्यय उर्वशीला आला असावा.

या फोटोवर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अनुष्का शर्माला राग येईल.’, ‘विराटला त्रास देऊ नकोस’ अशा अनेक कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. याआधीही उर्वशीला अनेक पोस्ट्सवरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button