breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी ‘वायसीएम’ला दिली भेट, कोरोनासंदर्भात सुसज्ज यंत्रणेचा घेतला आढावा

पिंपरी| महाईन्यूज| प्रतिनिधी

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका करत असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि वैद्यकीय व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आज पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या समवेत संत तुकाराम नगर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास भेट दिली.

यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोषअण्णा लोंढे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मेडीसीन कक्ष प्रमुख डॉ. प्रविण सोनी, सहयोगी प्राध्यापक डॉ. किशोर खिलारे, वैद्यकीय अधिकारी अविनाश लाठी तसेच रुग्णालयातील मेट्रन, स्टाफ नर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज असली पाहिजे. शहरात स्वतंत्र विलगीकरण कक्ष आणि अतिदक्षता कक्ष यांची आवश्यकता भासणार आहे. यासाठी महापालिका स्तरावर महापौर ढोरे आणि आयुक्त हर्डीकर यांनी वेळोवेळी विविध बैठका घेवून नियोजन केले आहे. महापालिकेचे पदाधिकारी, नगरसदस्य, अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपसात समन्वय साधून अधिक गतीमान यंत्रणा निर्माण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. आपत्कालीन परिस्थितीत उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जबाबदारीचे भान राखून सर्व स्तरावर सूक्ष्म नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात येत आहे. या व्यवस्थापनाचा आढावा विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी घेतला.

कोरोना आजारासंदर्भात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय स्वतंत्रपणे आणि पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करीत आहे. या रुग्णालयाच्या शेजारील डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज, हॉस्पीटल एण्ड रिसर्च सेंटरसमवेत समन्वय साधून नियोजन करावे, या रुग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफ नर्स यांची सेवा देखील महापालिकेच्या या कोरोना कक्षासाठी मिळणे गरजेचे आहे अशी मागणी पक्षनेते नामदेव ढाके यांनी यावेळी केली. यावर सकारात्मकता दर्शवत विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून त्याबाबत माहिती घेतली.

या रुग्णालय व्यवस्थापनाशी चर्चा सुरु असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. याप्रकरणी काही आवश्यकता भासल्यास विभागीय आयुक्त म्हैसेकर संबंधितांशी चर्चा करणार आहेत. विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील नव्याने उभारण्यात आलेले विलगीकरण कक्ष तसेच अतिदक्षता कक्षाची पाहणी केली. याठिकाणी कार्यरत असणा-या वैद्यकीय अधिका-यांशी चर्चा करुन अधिक माहिती घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button