breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासगी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची ‘आरटीपीसीआर’ टेस्ट पालिकेने करावी – अतुल शितोळे

पिंपरी / महाईन्यूज

शाळा सुरू होणार असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेसह खासगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची मोफत ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करण्याचे सरकारचे आदेश आहेत. तरी, पिंपरी-चिंचवडमधील शासकीय रुग्णालयात खासगी विनाअनुदानित शाळेच्या कर्मचा-यांची तपासणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सर्वच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची तपासणी मोफत करण्यात यावी, अशी मागणी महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे यांनी केली आहे.

यासंदर्भात शितोळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 30 नोव्हेंबर 2020 पासून शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील शासकीय व खासगी अशा सर्व शाळा सुरू होणार आहेत. तत्पुर्वी, शाळेचे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करणे अनिवार्य केले आहे. ही टेस्ट शासकीय रुग्णालयात मोफत स्वरुपात करण्याचे आदेश राज्य सरकारने स्थानिक आस्थापनांना दिले आहेत. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांची मोफत टेस्ट केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याची खंत शितोळे यांनी व्यक्त केली आहे.

शासकीय, निमशासकीय व अनुदानित शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची मोफत तपासणी केली जात आहे. विनाअनुदानित खासगी शाळांचे शिक्षक व कर्मचा-यांना खासगी प्रयोग शाळेत तपासणी करण्याच्या सूचना पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून दिल्या जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. एखाद्या विनाअनुदानित शाळेतील शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचा-याने शाळेचा खर्च वाचविण्यासाठी कोविड 19 ‘आरटीपीसीआर’ टेस्ट नाही केली, आणि संबंधित कर्मचारी पॉझिटिव्ह असल्यास त्याचा विद्यार्थ्यांना प्रादुर्भाव झाल्यास याला कोण जबाबदार राहील ? असा सवाल देखील शितोळे यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून खासगी विनाअनुदानित शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची ‘आरटीपीसीआर’ टेस्ट महापालिकेने मोफत करून द्यावी, अशी मागणी शितोळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button