breaking-newsक्रिडा

ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धा : मनप्रीत, राणीकडे भारताचे नेतृत्व

नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे, तर महिला संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे सोपवण्यात आले आहे. १ आणि २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एफआयएच ऑलिम्पिक पात्रता हॉकी फेरीसाठी भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली.

ओडिशा येथे रंगणाऱ्या या ऑलिम्पिक पात्रता फेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारतीय पुरुष संघाची लढत २२व्या क्रमांकावरील रशियाशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय महिलांसमोर १३व्या क्रमांकावरील अमेरिकेचे आव्हान असणार आहे.

’ पुरुष हॉकी संघ : मनप्रीत सिंग (कर्णधार), पी. आर. श्रीजेश, कृष्णन पाठक, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, गुरिंदर सिंग, रुपिंदरपाल सिंग, अमित रोहिदास, निळकंठ शर्मा, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, ललित कुमार उपाध्याय, एस. व्ही. सुनील, मनदीप सिंग, आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, सिमरनजीत सिंग.

’ महिला हॉकी संघ : राणी रामपाल (कर्णधार), सविता, रजनी इथिमारपू, दीप ग्रेस इक्का, गुरजीत कौर, रिना खोखार, सलिमा टेटे, सुशीला चानू पुखरामबाम, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलिमा मिंझ, नमिता टोप्पो, वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवज्योत कौर आणि शर्मिला देवी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button