breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यार्थिनीची हत्या; पिंपरी-चिंचवड ‘अभाविप’कडून निषेध फेरी काढून निदर्शने

पिंपरी |महाईन्यूज|

हरियाणातील बल्लभगड येथे धर्मांतर न केल्या कारणाने निकिता तोमर या विद्यार्थिनीची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी-चिंचवड महानगराच्या वतीने आज (शनिवारी) चापेकर वाडा येथून निषेध फेरी काढण्यात आली. तसेच जोरदार निदर्शने करण्यात आली.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत, पिंपरी-चिंचवड विस्तार प्रमुख अशोक सैनी, पुणे जिल्हा संयोजक गौरव वाळुंजकर, सह संयोजक ऋषी विडोळे, महानगरमंत्री तेजस चवरे, संभाजी शेंडगे, शुभम मोटे, वैभव बिरंगल, प्रतीक्षा काटकर, रोहन सावणे, वैभव जगताप, चिंतामणी खरात, आकाश वाघमारे, आदेश पडवळ, साहिल भुताडा आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

हरियाणातील बल्लभगड येथे धर्मांतर न केल्या कारणाने निकिता तोमर हिची भरदिवसा गोळ्या घालून हत्या झाली. यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्येही उमटले आहेत. या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने फेरी काढून निषेध केला. चिंचवड येथील चापेकर चौकात जोरदार घोषणाबाजी करीत आरोपीला फाशी देण्याची मागणी अभाविपच्या पदाधिकारी आणि कार्यर्त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button