breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून विद्यापीठ – महाविद्यालयीन परीक्षा होणार : उदय सामंत

मुंबई। महाईन्यूज । प्रतिनिधी

विद्यापीठ,महाविद्यालय परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष याबाबत  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाला  प्राप्त झाल्या  आहेत.आयोगाच्या प्राप्त  सूचनांच्या  अधीन राहून राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा घेतल्या जातील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.

श्री. सामंत म्हणाले, पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा या दि.१ जुलै ते १५ जुलै 2020  दरम्यान घेण्यात याव्यात तसेच बारावी नंतरचा प्रवेश लवकरात – लवकर देऊन दिनांक १ सप्टेंबर २०२० पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करावी, असा सूचना  आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्ष याचे वेळापत्रक तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसोबत लवकरच  व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून  बैठक आयोजित करण्यात येणार  आहे. या बैठकीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांवर सविस्तरपणे चर्चा करून राज्यातील परीक्षा आणि  शैक्षणिक वर्ष याचा  अहवाल तयार करून  सर्व कुलगुरूंशी चर्चा करून अंतिम अहवाल तयार करण्यात  येईल. त्यानंतर राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव याचा अंदाज घेऊन  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यांच्या सोबत परीक्षापद्धती आणि शैक्षणिक वर्षयाबाबत चर्चा करून लवकरच परीक्षेचे वेळापत्रक  जाहीर करण्यात येईल.असे ही श्री. सामंत यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button