breaking-newsपुणेमहाराष्ट्र

विद्यापीठाची गुणपत्रे, प्रमाणपत्रांवर क्यूआर कोड, होलोग्राम आवश्यक!

देशभरातील विद्यापीठांना त्यांची गुणपत्रिका, प्रमाणपत्रे सुरक्षित करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सूचना दिली आहे. विद्यपीठाची गुणपत्रे, प्रमाणपत्रांवर विद्यार्थ्यांचे छायाचित्र, क्यूआर कोड, संस्थेचा होलोग्राम असणे आवश्यक असल्याचे यूजीसीने परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शिक्षणातील गोरखधंद्याला काही प्रमाणात तरी चाप बसण्याची अपेक्षा आहे.

गेल्या काही काळात बोगस पदव्या दिल्या जात असल्याचे, बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. या पाश्र्वभूमीवर शिक्षणातील हे गैरप्रकार रोखण्यासाठी यूजीसीने काही बदल सुचवले आहेत. त्यांची येत्या शैक्षणिक वर्षांपासून त्याची अंमलबजावणी विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांकडून होणे अपेक्षित आहे. सद्य:स्थितीत काही विद्यपीठांच्या गुणपत्रे, प्रमाणपत्रांवर होलोग्राम आहेत.

मात्र, विद्यापीठांनी थोडा बदल करून क्यूआर कोड, विद्यार्थ्यांचे छायाचित्र दिल्यास ती अधिक सुरक्षित होऊ  शकतील. विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांनी गुणपत्रे, प्रमाणपत्रांवर होलोग्राम, क्यूआर कोड, विद्यार्थ्यांचे छायाचित्र, शिक्षण संस्थेचे नाव द्यावे. तसेच विद्यार्थ्यांने कोणत्या पद्धतीने (दूरशिक्षण, नियमित, अर्धवेळ) अभ्यासक्रम पूर्ण केला त्याचीही माहिती स्पष्टपणे नमूद करावी. विद्यार्थी आयुष्यभर या प्रमाणपत्रांचा वापर करत असल्याने या बाबतीत काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी करावी, असे यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

देशात एकसमानता येईल

विद्यापीठांच्या गुणपत्रे, प्रमाणपत्रांवर यूजीसीच्या निर्देशांनुसार क्यूआर कोड, होलोग्राम, विद्यार्थ्यांचे छायाचित्र दिल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. त्यामुळे देशातील उच्च शिक्षणाच्या व्यवस्थेत एकसमानता येण्यास मदत होईल, असेही यूजीसीचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button