breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग बंद

पंढरपूर |महाईन्यूज|प्रतिनिधी

नाताळनिमित्त अनेक जण सुट्टी घेऊन देवदर्शनासाठी आले असून पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. भाविकांचे लवकर दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने ऑनलाइन बुकिंग दर्शन सेवा बंद केली आहे. आज नाताळनिमित्त पंढरपूर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढली आहे. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, नगरप्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गजबजून गेला आहे.

नाताळ सणाच्या काळात अनेक जण सुट्टी काढून पर्यटन तसेच धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरात राज्य-परराज्यातून दर्शनासाठी भाविक दाखल झाले आहेत. शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास भाविकांनी गजबजले आहे. या ठिकाणी माफक दरात चांगली सुविधा मिळत असल्याने अनेक जण मुक्कामी येतात. चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा आणि त्यानंतर विठ्ठलाचे पदस्पर्श किंवा मुखदर्शन असा भाविकांचा दिनक्रम असतो. गेल्या तीन दिवसांत पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांचे जलद दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून 2 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाइन बुकिंग दर्शन सुविधा बंद करण्यात आली आहे. दर्शन रांग जलद गतीने पुढे जावी, यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांचीही मदत घेतली जात आहे. मंदिर समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांची रजा आणि साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button