breaking-newsराष्ट्रिय

विजेचे मीटर होणार स्मार्ट प्रि पेड

नवी दिल्ली – येत्या 3 वर्षात देशातील विजेचे सर्व मीटर स्मार्ट प्रि पेड होणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी दिली. ऊर्जा मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे आयोजित मीटर उत्पादकांच्या बैठकीत ते आज बोलत होते. सर्व मीटर उत्पादकांनी स्मार्ट प्रि पेड मीटरच्या किंमती कमी करुन त्याचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित उत्पादकांना केले.

एका विशिष्ट अवधिनंतर स्मार्ट प्रि पेड मीटर बंधनकारक करण्याबाबतचा प्रस्ताव ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी विचारात घ्यावा, अशी अपेक्षा सिंग यांनी व्यक्त केली. या बैठकीत स्मार्ट मीटरशी संबंधित विविध तांत्रिक बाबींसंदर्भात चर्चा करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button