Uncategorized

विजेंदर सिंह आणि परेश रावल यांच्यात ट्विटयुद्ध

नवी दिल्ली | महाईन्यूज |

दिल्लीतील ईशान्य भागात झालेल्या कथित धार्मिक हिंसेत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेवर राजकारणापासून बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंह याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला अभिनेते परेश रावल यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विजेंदरने दिल्ली हिंसेनंतर ट्विट करत म्हटले की, संपूर्ण देशाला गुजरात बनवून टाकतील. अजुनही वेळ गेली नाही.’ विजेंदरची ही टीका  नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर होती.

मात्र अभिनेता आणि माजी खासदार परेश रावल यांना विजेंदरचे ट्विट आवडले नाही. विजेंदरच्या ट्विटला रिट्विट करत परेश रावल म्हणाले की,  तुम्हाला बॉक्सिंग आणि बकवास यातील फरक समजायला हवा. यावर विजेंदरने पुन्हा प्रत्युत्तर दिले. 

परेश रावल यांना प्रत्युत्तर देताना विजेंदर म्हणाला की, “सर बॉक्सिंग मला येते,  बकवास दोन लोकांकडून शिकत आहे”.

अशा पद्धतीने परेश रावल आणि विजेंदर सिंह यांच्यामध्ये ट्विटयुद्ध सुरु असलेलं पहायला मिळालं…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button