breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वारीतील दिंडी प्रमुखाना पिंपरी महापालिकेतर्फे आज ताडपत्री वाटप

पिंपरी –  महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना देण्यात येणारी भेटवस्तूची परंपरा कायम ठेवत नगरसेवकांच्या मानधनातून सोय करण्यात आली. आज (शुक्रवारी) शहरात ताडपत्रीचे वाटप करणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील एकूण 650 नोंदणीकृत दिंडी प्रमुखांना भेटवस्तू दिली जाते. महापालिकेने गतवर्षी दिंडीप्रमुखांना ताडपत्री भेट दिली होती.  3 हजार 428 रुपये दराच्या ताडपत्रीसाठी एकूण 22 लाख 18 हजार खर्च झाला. मात्र, यंदा उच्च न्यायालयाचे आदेश व राज्य शासनाच्या अध्यादेशामुळे भेटवस्तू खरेदी करता येत नाही. त्यामुळे भेटवस्तू खरेदी न करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला. त्यामुळे नगरसेवकांच्या मानधनातून ताडपत्री खरेदी करण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. कमी कालावधीत तंबूऐवजी सर्वानुमते ताडपत्री निश्‍चित करण्यात आली.

दरम्यान, यंदा वारक-यांना दिल्या जाणा-या ताडपत्रीचा आकार 15 बाय 9 फूट असून, त्याचा दर 2 हजार रुपयापर्यंत आहे. मात्र, मागील वर्षीप्रमाणे आकार व दर्जा वेगळा असल्याने या ताडपत्रीचा दर कमी असल्याचा दावा पदाधिकार्‍यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button