breaking-newsपिंपरी / चिंचवड

वारक-यांना अडीच हजार प्रथमोपचार पेट्यांचे वाटप

पिंपरी – ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ संघटनेच्या बांधकाम व्यावसायिकांनी वारीच्या निमित्ताने वारक-यांना २५०० प्रथमोपचार पेट्यांचे वाटप करून आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. निगडी येथे भक्ती-शक्ती चौकात मंगळवारी संध्याकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी-चिंचवड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व क्रेडाई पुणेचे उपाध्यक्ष अनिल फरांदे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतिलाल कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या दिंडीतील वीणेक-यांना या प्रथमोपचार पेट्यांचे वाटप करण्यात आले. वारीच्या काळात उद्भवणा-या आरोग्य समस्यांवर उपयोगी पडणारी औषधे व प्रथमोपचार साधने यांचा या पेटीत समावेश आहे.

संतोष कर्नावट, विनोद चंदवानी, अनुप जमतानी, मीनाक्षी जमतानी, लीना कुकरेजा, तसेच क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, संस्थेचे कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी या वेळी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button