breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएम रूग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेचा सिक्युरीटी गार्ड कडून विनयभंग

पिंपरी – वायसीएम रूग्णालयात नोकरी करणा–या सिक्युरीटी गार्डने आपण पोलीस असल्याचे सांगत रूग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेचा विनयभंग केला. सोमवारी (दि.21) रात्री नऊच्या सुमारास हि घटना घडली.

वाचा :-हुंडाबळी ! विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा

याप्रकरणी पिडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल मारूती स्वामी (वय 47, रा. खडकी बाजार, पुणे) याला अटक करण्यात आली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वायसीएम रूग्णालयात उपचार घेत होती. अटक आरोपी हा रूग्णालयात सिक्युरीटी गार्डची नोकरी करतो. आरोपीने आपण पोलीस असल्याचे सांगत फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. महिलेच्या आजारपणाचा फायदा घेऊन आरोपीने तिचा विनयभंग केला. दाखल फिर्यादी नुसार आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button