breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएममधील आर्थिक गैरव्यवहार; आयुक्तांनी चौघांची वेतनवाढ रोखली

पिंपरी – महापालिकेच्या प्रशासनातील गलथान कारभाराचा नमुना यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पहायला मिळत आहे. वायसीएममध्ये झालेल्या अपहारप्रकरणी संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आणखी एका उपलेखापालासह चार जणांवर हलगर्जीपणा व गैरवर्तनाचा ठपका ठेवला आहे. तसेच, चौघांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली असून लाखो रुपयांचा अपहार झालेल्या या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांवर कारवाई झाली आहे.

वायसीएम रुग्णालयाच्या कॅश काउंटरमध्ये कार्यरत असलेल्या बाळू मारुती भांगे या कर्मचा-याने हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टिममध्ये फेरफार करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण पुढे आले होते. त्यामध्ये तथ्थ आढळल्यानंतर भांगे या कर्मचा-याचे निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली होती. प्राथमिक तपासणीत किती रक्कमेचा अपहार झाला, याची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत कॅश घोटाळ्यात तब्बल ३ लाख ६० हजार ८०१ रुपयांचा अपहार झाल्याचे सिध्द झाले होते.

अपहारातील एकूण ३ लाख ६० हजार ८०१ रुपये ही लिपिक बाळू भांगे यांच्याकडून वसूल करण्यात आले आहेत. त्यानंतर बाऴू भांगे याची खातेनिहाय चौकशी सुरू होती. या प्रकरणाची संपुर्ण चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यात आणखी चार जणांना दोषी धरण्यात आले आहे. त्यामध्ये उपलेखापाल बबलू तेलंगी, मुख्य लिपिक पांडुरंग बवले, लिपिक सुरज पाटकर, इस्माईल शेख यांचा समावेश आहे. या चौघांचे गैरवर्तन, हलगर्जीपणा, निष्काळजीपणामुळे बाळू भांगे हा अपहार करू शकला. हा ठपका ठेवत या चौघांची एक वेतनवाढ रोखून ठेवण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button