breaking-newsपुणे

वाढदिवसानिमित्त तलवारीने कापला केक, बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुण्यात जुन्नर तालुक्यात एका मलुाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी केक हा तलवारीने कापण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल केला आहे.

रोहन बेल्हेकर असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रोहनने वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कपला. याचे फोटोही व्हायरल झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

रोहनचा वाढदिवस 2 मार्च रोजी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मित्रांनी डीजेच्या दणदणाटात नाचण्याचा मनमुराद आनंदही लुटला. वाढदिवस साजरा होत असताना रोहन बेल्हेकर याने तलवारीने केक कापला. केक कापलेले फोटो आणि काही व्हिडीओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाले. वाढदिवस करताना तलवार या घातक हत्याराने केक कापला आणि गावांमध्ये घातक हत्यार घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती नारायण गाव पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी बर्थडे बॉय रोहन बेल्हेकरवर गुन्हा दाखल केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button