वही आणण्यास गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी निगडीतून बेपत्ता
पिंपरी – वही आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रिया रामदास खंदारे (वय, 15) सपना रामदास खंदारे (वय 17, दोघी रा. मोरेवस्ती, चिखली) या दोघी बहिणी बेपत्ता झाल्या आहेत. या प्रकरणी त्यांचा भाऊ प्रवीण रामदास खंदारे (वय 26) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिया आणि सपना दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत. सध्या त्यांनी घराजवळच मेहंदी शिकण्यासाठी क्लास लावला आहे. 1 जुलै रोजी सायंकाळी वही आणण्यासाठी आईकडून पन्नास रुपये घेऊन त्या दोघी घराबाहेर पडल्या आहेत. नुकतेच ओटा स्कीम येथून दोन मुली बेपत्ता झाल्या होत्या. मात्र पोलिस तपासात त्या सोलापूर येथील नातेवाईकाकांकडे मिळून आल्या आहेत. प्रिया आणि सपनासाठी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. निगडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.