breaking-newsताज्या घडामोडीलेख

वर्धा येथील लक्ष्मीनारायण मंदिर हरिजनांसाठी खुले करणारी ‘ती’ महिला कोण?

मंदिर प्रवेशावरुन देशातील विविध प्रार्थनास्थळांवर आंदोलन होताना दिसते. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात एका महिलेने महाराष्ट्रातील वर्धा येथील लक्ष्मीनारायण मंदिर हरिजनांसाठी खुले करण्यासाठी पुढाकार घेतला. त्या गांधीवादी महिलेचे नाव आहे जानकी देवी बजाज…आज त्यांचा जन्मदिवस…त्यानिमित्ताने आपण जाणून घेवूयात जानकीदेवींच्या जीवनाबाबत काही महत्वपूर्ण बाबी…

जानकी देवी बजाज यांचा जन्म ७ जानेवारी १८९३ रोजी मध्यप्रदेश येथील जरौरामधील एका प्रतिष्ठित वैष्णव मारवाडी कुटुंबात झाला.  शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. अवघ्या आठव वर्षाच्या असताना त्यांचा विवाह बजाज कुटुंबात करण्यात आला. विवाहनंतर जानकीदेवी पती जमनालाल बजाय यांच्यासोबत महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी वास्तव्यास आल्या. जमनालाल हे महत्मा गांधी यांच्या विचारांचे अनुकरण करणारे होते. त्यामुळे सहजाजिकच जानकीदेवी या गांधीवादी विचारांनी प्रभावीत झाल्या. विशेष म्हणजे, विनोबा भावे हे बजाज परिवारोच आत्मिक गुरू होते. भावेंनी जानकीदेवी यांना मोठी बहिण मानले होते.

विशेष म्हणजे,  भारतात पहिल्यांदा १७ जुलै १९२८ रोजी वर्धा येथील लक्ष्मीनारायण मंदिरात जानकीदेवींनी प्रवेश केला. त्यादिवसापासून हे मंदिर हरिजनांसह सर्वांसाठी खुले करण्यात आले.

जानकी देवींच्या कार्याचा आढावा :

  • पती जमनालाल बजाज यांच्या सहमतीने जानकीदेवींनी पर्दा प्रथेचा त्याग केला.
  • १९१९ मध्ये त्यांचा आदर्श घेवून हजारो महिलांनी पर्दा प्रथेला विरोध केला.
  • खादी आणि स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी जानकीदेवींनी सिल्क कपड्यांचा त्याग करून खादीचा वापर सुरू केला. तसेच, महिला खादी सूत कातणे शिकवण्यास सुरूवात केली.
  • स्वदेशीच्या आंदोलनात विदेशी कपड्यांची होळी करण्याबाबत वर्धात जानकीदेवींनी पुढाकार घेतला.
  • महिला शिक्षणासाठी त्यांनी कार्य केले आहे.
  • विनोबा भावे यांच्यासोबत कूपदान, ग्रामसेवा आणि भूदान अशा आंदोलनात सहभागी झाल्या.
  • १९४२ पासून अनेक वर्षे जानकीदेवी भारतीय गौसेवा संघाच्या अध्यक्ष होत्या.

***

कोण होते जमनालाल बजाज?

राजस्थानमधील काशी का वास गावातील एका शेतकरी कुटुंबात म्हणजेच कनीराम बजाज यांच्या घरी ४ नोव्‍हेंबर १८८९ रोजी जमनालाल बजा यांचा जन्म झाला. त्यांचे आईचे नाव बिरदीबाई होते. स्वांतत्र्यसैनिक, उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आहे. महात्मा गांधी यांचे निकटवर्ती बहुदा गांधी यांनी जमनालाल यांना पुत्र मानल्याचे बोलले जाते. १९२० मध्ये जमनालाल काँग्रेसचे कोषाध्यक्ष झाले. महाराष्ट्रातील वर्धामध्ये बच्छराज नावाच्या शेठजींनी त्यांना पाच वर्षांचे असताना दत्तक घेतले होते. बच्छराज मुळचे राजस्थानमधील सीकर येथील होते. त्यांचे पूर्वज सुमारे १०० वर्षांपूर्वी नागपूर येथे वास्तव्यास आले होते. लहानपणापासून जमनालाल यांचा कल अध्यात्माकडे होता. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह जानकीदेवी बजाज यांच्याशी थाटात झाला होता. वर्धा येथे सत्याग्रह आश्रमची स्थापना त्यांनी केली आहे. यासह गौ सेवा संघ, गांधी सेवा संघ, स्वस्त साहित्य मंडळ अशा संस्थांनी स्थापना जमनालाल बजाज यांनी केली आहे. जातीभेद विरोधात कायम भूमिका घेणारे जमनालाल यांनी दलितांच्या उत्थानासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जमनालाल बजाज पुरस्कार प्रदान केला जातो. १९१८ मध्ये त्यांना ‘राय बहादुर’ पदवीने सन्मानित केले होते. मात्र, १९२० मधील कलकत्ता अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यावर जमनालाल यांनी आपली पदवी परत केली होती.  ११ फेब्रुवारी १९४२ रोजी जमनालाल बजाज यांचा मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button