breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वन विभागाच्या फाटक्या जाळीतून बिबट्याने ठोकली धूम

पुणे |महाईन्यूज|

कोयाळी – भानोबाची (ता. खेड) येथे वनविभागाच्या जाळ्यात अडकलेला बिबट्याचा बछडा धूम ठोकून उसाच्या शेतात पसार झाला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभाग प्रशासनाच्या बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे जाळ्यात अडकलेला बछडा पळून जाण्यात यशस्वी झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे बिबट्या पळून गेल्यानंतर वनविभाग प्रशासनाने लगतच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कोयाळी – भानोबाची, साबळेवाडी, मरकळ, गोलेगाव – पिंपळगाव, बंगलावस्ती, दौंडकरवाडी, रामनगर, साबळेवस्ती, चिंचोशी आदी ठिकाणी बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. मात्र मंगळवारी (दि.५) रात्री अडीचच्या सुमारास कोयाळीतील बापदेववस्ती येथे शिकारीच्या शोधात एक बिबट्या थेट भर लोकवस्तीत शिरला. मात्र येथील उपसरपंच विठ्ठल कोळेकर यांच्या घरासमोर कुत्र्यांची आणि बिबट्याची झटापट झाली.

मात्र, मोठमोठ्याने कुत्र्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून नागरीक झोपेतून उठून घराबाहेर आले असता झाडावर त्यांना बिबटया पहायला मिळाला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, सूर्योदयानंतर वनविभाग प्रशासनाने घटनास्थळी ३० ते ४० कर्मचाऱ्यांना पाचारण करून बाभळीच्या शेंड्यावर बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू केले. प्रारंभी बाभळीच्या झाडालगत स्थानिक तरुणांच्या साह्याने जाळे पसरविण्यात आले. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने बंदुकीद्वारे बिबट्यास बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने झाडावरून जमिनीवर उडी मारली. परंतु वनविभागाने पसरविलेली जाळी फाटकी असल्याने बिबट्या जाळीतून लगत असलेल्या उसाच्या शेतात पळून जाण्यास यशस्वी झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button