breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांची गाडी अडवून पोलिसांची दादागिरी

कोल्हापूर – सोलापूर येथे आयोजित प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेसाठी जात असणा-या वाहन ताफ्यातील स्टार प्रचारक अनिल म्हमाणे यांच्या गाडीची तपासणी करत असताना काहीच न सापडल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या अधिका-याने थेट कोचिंग फाडण्याची धमकी दिल्याने तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

आज दि. २८ मार्च रोजी सोलापूर आणि मंगळवेढा येथे वंचित बहुजन आघाडीचा प्रचार दौरा होत आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी स्टार प्रचारक अनिल म्हमाणे, प्रवक्ते प्रा. कपिल राजहंस, कायदा आघाडीचे अॅड. सरदार किरवेकर, प्रसिद्धी प्रमुख राहुल राजहंस, डॉ. दयानंद ठाणेकर आज पहाटे हुपरी मार्गे इचलकरंजीकडे येत होते, त्यावेळी पंचगंगा नदी पुलावर असणा-या पोलीस चेक पोस्टवर गाड्या अडवून तपासणी करण्यात येत होती. गाडीत असणा-या स्टार प्रचारक यांनी पूर्ण सहकार्याची भावना ठेवली असताना पोलीस अधिका-यांनी मात्र वंचित आघाडीचे पदाधिकारी असल्याचे समजताच मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान सर्व बाबी कायदेशीर असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या त्या अधिका-याने थेट गाडीचे कोचिंग फाडण्याची भाषा वापरली. त्यावेळी वादावादी झाली. सदर प्रकरणी मोठा असंतोष पसरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button