breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकल, एक्स्प्रेसबरोबर आता राज्यातील एसटीसेवाही बंद

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी लोकल, एक्स्प्रेसबरोबर आता राज्यातील एसटीसेवाही बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे… कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एसटीसेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता भारतातील प्रत्येक राज्यातही राज्य शासनाकडून काही कठोर पावलं उचलण्याच येत आहेत. 

केवळ अत्यावश्यक सेवेसांसाठी  बस सेवा या सुरु राहतील. या बसनं केवळ अत्यावश्यक गोष्टींची ने- आण होईल किंवा या सेवा पुरवणारे कर्मचारीच याचा वापर करतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून मालवाहतूक वगळता सर्व प्रवासी वाहतूक तूर्तास बंद राहणार आहे. ३१ मार्चपर्यंत लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button