breaking-newsपिंपरी / चिंचवड

लेप्रोस्कोप खरेदी निविदेत भ्रष्टाचार, भाजप नगरसेवक तुषार कामठे यांचा आरोप

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

लेप्रोस्कोप खरेदी निविदा मागील वर्षी प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदापूर्व बैठक झाल्यानंतर काही कारणांमुळे ती रद्द करण्यात आली होती. तदनंतर संदर्भ क्रमांक 2 अनुसार त्याच निविदेमधील परिमाणामध्ये बदल (पूर्वी दोन व नंतर चार लॅप्रोस्कोप) करण्यात आलेय याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली.

सदर निविदा पहिल्यांदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यासंबंधी झालेल्या निविदापू बैठकीत स्पेसिफिकेशन बदलण्याबाबत अथवा फेर निविदा घेणेबाबतकुठलाही उल्लेख केला गेला नव्हता व निविदा पुन्हा प्रकाशित करण्यात आली होती . सदर निविदेला शुद्धिपत्रक देऊन संदर्भ क्रमांक 3 नुसार मूळनिविदेमधील स्पेसिफिकेशन बदलून ती पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली आहेब पुन्हा निविदापूर्व बैठक होणार नाही असा उल्लेख करण्यात आला आहे . निविदेतील परिमाण वाढीमुळे निविदेची रक्कम दीड कोटींच्या पुढे गेली आहे . आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिनांक 04/08/2017 रोजी प्रसिद्ध झालेल्या परिपत्रक क्र . लेखा । 19/6758/2017 अन्वये रुपये दीड कोटीपेक्षा जास्त रकमेच्या निविदेसाठी मूळ स्पेसिफिकेशन मध्ये बदल करावयाचा असल्यास निविदापूर्व बैठक बोलावणे आवश्यक आहे.

अद्ययावत तंत्रज्ञान असलेले उपकरण साहित्य बाजारात उपलब्ध असूनदेखील कालबाह्य झालेल्या साहित्याची खरेदी ठराविक कंपनीला डोळ्यासमोर ठेऊन घाईने उरकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.यामध्ये उत्पादक कंपनी, पुरवठाधारक व आपल्या महानगरपालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी यांचे आर्थिकहितसंबंध गुंतल्याचा संशय येत आहे . सदर निविदेत वारंवार करण्यात येत असलेले बदल हे ठराविक कंपनीला डोळ्यासमोर ठेऊन करण्यात येत असलेबद्दल शंका उत्पन्न होत आहे . आणि असे जर झाले तर या निविदेतील खरेदीत स्पर्धा होणार नाही .

वाजवी किमतीला अद्ययावत उपकरणे बाजारात उपलब्ध असूनदेखील कालबाह्य तंत्रज्ञान असलेले उपकरण अवाजवी दरात खरेदी केली जात आहे . या सर्वामुळे आपल्या महानगरपालिकेचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. परिणामी सर्वसामान्य करदाता जो आधीच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मेटाकुटीस आला आहे त्याचे नुकसान होणार आहे. तरी आपणांस नम्र विनंती आहे कि सदर निविदेबद्दल सखोल चौकशी करून सदरची निविदा ताबडतोब रद्द करण्यात यावी व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक कामठे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button