breaking-newsआंतरराष्टीय

लाहोरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर 20 फूटांचा खड्डा

लाहोर :  पाकिस्तानच्या लाहोरमध्ये सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे किमान 8 जणांचा मृत्यू तर 50 जण जखमी झाले आहेत. 10 तासांमध्ये 280 मिलिमीटर पाऊस पडल्याने शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, घरे आणि वाहने पाण्याखाली गेली आहेत.

शहरातील 150 इलेक्ट्रिसिटी फीडर्स पाण्याखाली गेल्याने शहरातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. पावसाने 38 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. या अगोर 1980 मध्ये लाहोरमध्ये 207 मिलिमीटर पावसाची नेंद झाली होती.  पाकिस्तानच्या हवामान विभागानुसार लाहोर, गुजरानवाला, रावळपिंडी, फैसलाबाद, सरगोधा, कोहट, बन्नू, डेरा इस्माइल खान आणि डेरा गाजीमध्ये आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button