breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

रांची – चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अचानक अस्थिर झाली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाचा :-#Covid-19: भारतामध्ये 8,00,242 जणांची काल कोविड-19 साठी चाचणी

लालू प्रसाद यादव यांची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली असून त्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी म्हणजे आज त्यांचे सीटी स्कॅन करण्यात येणार असल्याचे समजते आहे. दरम्यान, लालू यांना किडनी आणि हृदयविकाराचा त्रास असून मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रासदेखील आहे. तसेच त्यांच्या किडण्या केवळ 25 टक्के काम करत असल्याची माहिती रिम्सच्या डॉक्टरांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button