breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

लालबागमध्ये सिलेंडरच्या भीषण स्फोटात 20 जण जखमी

मुंबई: मुंबईतील लालबाग मधील साराभाई इमारतीच्या एका बंद खोलीत गॅस स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 20 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळच्या वेळेस ही घटना घडली असून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि मोठे दोन टँकर्स ही घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेली आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या खोलीतून गॅस लीक असल्याचा वास येत होता. त्यामुळे गॅस लीकचा वास कुठून येत असल्याचे पाहण्यासाठी स्थानिक गेले असता त्याचा अचनाक स्फोट झाला आहे. यामध्ये 20 जण जमखी झाल्याचे सांगण्यात आलेले आहे. तसेच घटनास्थळी पोलीस ही दाखल झालेले असून पुढील तपास केला जात आहे.

दरम्यान, काल मध्यरात्री सुद्धा ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा मधील दोस्ती कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या एका दुकानाला आग लागल्याची घटना घडलेली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या होत्या. या प्रकरणी कोणतीच जिवीतहानी किंवा दुखापत झालेली नसल्याचे सांगण्यात आलेले आहे.

आवश्य वाचा:- कृषी कायद्याबाबत शहाणपणाची भूमिका घ्या, शरद पवारांचा केंद्र सरकारला सल्ला

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button