breaking-newsक्रिडा

रेल्वे पोलिस, सेंट्रल रेल्वे, क्रीडा प्रबोधिनी संघांची आगेकूच

ऑलिम्पिक डे फाईव्ह-अ-साईड हॉकी अजिंक्‍यपद स्पर्धा 
पुणे – मुलांच्या गटात रेल्वे पोलिस, सेंट्रल रेल्वे, क्रीडा प्रबोधिनी, प्रियदर्शिनी स्पोर्टस्‌ सेंटर व खडकी युनायटेड यांनी, तर मुलींच्या गटात पाषाण इलेव्हन आणि 5 स्टार या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना ऑलिम्पिक डे फाईव्ह-अ-साईड हॉकी अजिंक्‍यपद स्पर्धेत आगेकूच केली. हॉकी महाराष्ट्रआणि हॉकी पुणे यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेचे महिला विभागामध्ये पाषाण इलेव्हन संघाने न्यू एम स्कूलचा 8-0 असा एकतर्फी पराभव केला. यामध्ये रुद्राणी साखरे, विन्चेले डिसुझा, प्रतिमा सिंग, साक्षी लिंगायत व ऋचा गायकवाड यांनी गोल केले. दुसऱ्या सामन्यात 5 स्टार संघाने एसएनबीपी ऍकॅडमीचा 10-1 असा धुव्वा उडविला. यामध्ये समृध्दी झुजाम हिने 3 तर, दुर्गा शिंदे, दीक्षा अवघडे व पूजा राठोड यांनी प्रत्येकी दोन तर, आरती शिंदे हिने एक गोल केला.

पुरुष गटामध्ये रेल्वे पोलिस संघाने खडकी एज्युकेशन सोसायटी संघाचा 16-1 असा धुव्वा उडविला. ओंकार मुसळे याने अर्धा डझन गोल मारताना विजयात मोलाचा वाटा उचलला.. सेन्ट्रल रेल्वे संघाने ग्रीन मेडोज्‌ संघाचा 7-5 असा पराभव केला.

पुरुष गटातील आणखी एका लढतीत क्रीडा प्रबोधिनी संघाने सिटी पोलिस संघाचा 7-0 असा सहज पराभव केला. प्रियदर्शिनी स्पोर्टस्‌ सेंटर संघाने किडस्‌ इलेव्हन संघाचा 9-2 असा सहज पराभव केला. खडकी युनायटेड संघाने अस्पत ऍकॅडमीचा 7-3 असा पराभव करून आगेकूच केली.

सविस्तर निकाल- 
महिला विभाग – अ गट – 1) पाषाण इलेव्हन- 8 (रुद्राणी साखरे 4, विन्चेले डिसुझा 9, प्रतिमा सिंग 13, 23 व 26 मि.; साक्षी लिंगायत 19 मि.; ऋचा गायकवाड 28 व 29 मि.) वि.वि. न्यू एम स्कूल- 0;
2) गट ब- 5 स्टार- 10 (समृद्धी झुजाम 3, 4, 9 मि.; दुर्गा शिंदे 5 व 29 मि.; आरती शिंदे 6 मि., दीक्षा अवघडे 8 व 21 मि., पूजा राठोड 14 व 20 मि.) वि.वि. एसएनबीपी ऍकॅडमी- 1 (अंजली सरोदे 16 मि.);
पुरुष गट- 1) रेल्वे पोलिस- 16 (ओंकार मुसळे 1, 3, 8, 24, 24 व 25 मि.; संकेत सपकाळ 4, 21 व 22 मि.; पृथ्वीराज साळुंके 4, 11, 12, 29 मि.; प्रकाश सपकाळ 20 व 28 मि.) वि.वि. खडकी एज्युकेशन सोसायटी- 1 (आशुतोष चाव्हरे 23 मि.);
2) गट ब- सेन्ट्रल रेल्वे- 7 (रमेश पिल्ले 1, अनिकेत मुथीया 13, 25 व 26 मि.; आशिष भोसले 15 मि., अंकित सपकाळ 16 मि., रूबिन केदारी 22 मि.) वि.वि. ग्रीन मेडोज- 5 (सदिफेन स्वामी 4, 18 मि., संग्राम पोकळे 7, 15 मि., अभिषेक स्वामी 30 मि.);
3) क्रीडा प्रबोधिनी- 7 (तालिब शहा 3, 4 मि.; राहुल शिंदे 5, 29 मि., हरीष शिंदगी 8 मि., अनिकेत गौरव 22, 24 मि.) वि.वि. सिटी पोलिस- 0;
4) गट क- प्रियदर्शिनी स्पोर्टस्‌ सेंटर- 9 (अथर्व कांबळे 6, 24 मि., अजिंक्‍य काळभोर 9, 20, अब्दुल सलामी 16 मि., अमन शर्मा 17, 21 मि., प्रणव मानव 23 मि., साजिद शहा 29 मि.) वि.वि. किडस्‌ इलेव्हन- 2 (हरजीत सिंग 26 मि.; अमित भोसले 29 मि.);
गट ड- खडकी युनायटेड- 7 (वृशोध 4 व 19 मि., आनंद जी. 5 मि., ग्रुफरुन 7, 22 मि., ऐफिझ वाय. 23, 27 मि.) वि.वि. अस्पत ऍकॅडमी- 3 (अभिषेक अस्पत 6 मि., स्वप्निल ढेरे 26 व 29 मि.).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button