breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; या स्थानकांवर थांबणार नाहीत लोकल

मुंबई | महाईन्यूज

रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती तसेच अन्य कामांसाठी आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याने चिंचपोकळी, करी रोड येथे लोकल थांबणार नाहीत. पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. या वेळी लोकल जलद मार्गावरून धावतील. तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान आज सकाळी १०.४२ ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत भायखळा स्थानकातून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या धिम्या लोकल भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावतील. या लोकलना दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबा असेल. मात्र, विद्याविहारपासून त्या धिम्या मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करी रोड येथे लोकलला थांबा नसेल. हार्बर मार्गावरून सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या लोकल आज सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ पर्यंत रद्द करण्यात येतील. सकाळी १०.२१ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीकडे एकही लोकल धावणार नाही. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल यादरम्यान विशेष लोकल धावतील. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button